"कोणी कितीही आदळआपट केली तरीही तुमच्या कर्तृत्त्वाला डाग लागणार नाही याची मला खात्री" : उद्धव ठाकरे

"कोणी कितीही आदळआपट केली तरीही तुमच्या कर्तृत्त्वाला डाग लागणार नाही याची मला खात्री" : उद्धव ठाकरे

मुंबई : तुम्ही अहोरात्र दक्ष राहता, जबाबदारी घेता म्हणून आम्ही आमचे सण उत्साहाने साजरे करतो. त्यासाठी तुमचे धन्यवाद, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत आभार व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी मुंबई पोलिस आयुक्तालयात नववर्षाचे स्वागत केले. तसेच कोणी कितीही आदळआपट केली तरी तुमच्या कर्तृत्त्वाला डाग लागणार नाही, याची मला खात्री आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "तुम्ही सतत ताणतणावात असता. नववर्षाची सुरुवात माझ्या बहाद्दर कुटुंबीयांच्या समवेत उपस्थित राहून करावी या जाणिवेने मी महाराष्ट्र आणि मुंबईतील नागरिकांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे. तुम्हाला हे वर्षच नाही तर पुढील अनेक वर्षे सुखाची, समाधानाची, भरभराटीची आणि ताणमुक्ततेची जावो, अशी प्रार्थना करतो. दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती जी काही नियंत्रणात आहे ती पोलिसांमुळेच", असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणालेत की, "कोरोनाच्या काळात फ्रंटलाईनवर लढताना अनेक पोलिस शहीद झाले. कोरोनाचे संकट आल्यावर आपण लॉकडाऊन केले. वर्क फ्रॉम होम करण्यास सर्वांना  सांगितले. क्षणभर विचार करा, पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केलं असतं तर काय झाले असते? पण तसं झालं नाही आणि म्हणूनच सध्याची नियंत्रणातील परिस्थिती आहे.

पोलिसांचे कर्तृत्व सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ आहे. त्यामुळे बदनामी करणा-यांची तोंडे बंद झाली, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. पोलिस दलाची बदनामी करणाऱ्यांची तोंडे बंद झाली. कारण तुमच्या कर्तृत्वाला तोड नाही. ही परंपरा 100-150 वर्षांपासूनची आहे. तुमचे कर्तृत्त्व सूर्यप्रकाशाएवढे मोठे आहे. त्यामुळे कोणी कितीही आदळआपट केली तरी तुमच्या कर्तृत्वाला कोणीही डाग लावू शकणार नाही, याची मला खात्री आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

chief minister Uddhav Thackeray and Aaditya Thackeray visited the Mumbai police headquarters

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com