'राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरूतुल्य मुर्ती काळाच्या पडद्याआड';मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवलिंग शिवाचार्य महाराजांना श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 1 September 2020

धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरुतुल्य अशी वंदनीय मुर्ती काळाच्या पडद्याआड गेली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिंगायत धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुंबई - धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरुतुल्य अशी वंदनीय मुर्ती काळाच्या पडद्याआड गेली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिंगायत धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

'सत्ता विसर्जनाचा मुहूर्त त्यांनाच विचारून काढतो'; देवेंद्र फडणवीसांचा स्वकीयांनाच टोला

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवूनही शिवाचार्य महाराजांनी धर्माचरण आणि ज्वलंत राष्ट्रवादाला वाहून घेतले.  विद्वत्ता आणि अमोघ वाणी यामुळे समाजाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून मानाचे स्थान दिले. त्यांनी धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. धर्मप्रसाराबरोबरच त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही काम उभे केले. शिवाचार्य महाराजांचे कार्य त्यांच्या लिंगायत अनुयायांसह समाजासाठी  मार्गदर्शक असेच आहे. शिवाचार्य महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!

 

मोठी बातमी! राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सेवेला हिरवा कंदील; उद्यापासून सुरू होणार बुकिंग

राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray pays homage to Shivacharya Maharaj