esakal | Maharashtra chief minister uddhav thackeray will address the people of maharashtra

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray
लॉकडाउनचं संकट: मुख्यमंत्री ठाकरे ८.३० वाजता जनतेशी संवाद साधणार
sakal_logo
By
दीनानाथ परब

राज्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना रुग्णांचा हा वाढता आकडा नियंत्रणात आणण्यासाठी आता लॉकडाउन एक पर्याय उरला आहे. राज्यात सध्या लॉकडाउनची जोरदार चर्चा सुरु आहे. राज्यातील मंत्र्यांनीही त्यादृष्टीने संकेत दिले आहेत. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री आज लॉकडाउनच्या निर्णयाची घोषणा करतील, अशी दाट शक्यता आहे.

मुंबईत पुढचे १५ दिवस म्हणजे ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाउन असेल असा अंदाज आहे. कोविड नियंत्रणात आणण्यासाठी नेमलेल्या टास्क फोर्सने लॉकडाउनचा पर्याय सुचवला आहे. लॉकडाउन लावला तर अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होईल. पण राज्यात आताच ऑक्सिजन, वेंटिलेटर्सची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत आहे. अनेक रुग्णांचा या वैद्यकीय साधनाअभावी मृत्यू होत आहे. त्याशिवाय संसर्गाचे प्रमाणही वाढत चाललेय.

त्यामुळे लॉकडाउनच्या कठोर निर्णयाची मुख्यमंत्री घोषणा करु शकतात. पण हा लॉकडाउन नेमका कसा असेल? त्याचे स्वरुप मागच्यावर्षीसारखेच असेल कि, सार्वजनिक वाहतुकीला त्यातून वगळणार, ते लवकरच स्पष्ट होईल. लॉकडाउन लावताना समाजातील छोट्यातील छोट्या घटकाचा विचार करा, आर्थिक पॅकेज जाहीर करा, अशा मागण्या विरोधी पक्षांनी केल्या आहेत. पण मुख्यमंत्री कशा प्रकारचा लॉकडाउन जाहीर करतात, ते लवकरच स्पष्ट होईल.