esakal | राष्ट्रवादी काँग्रेसची पराभूत उमेदवारांसोबत बैठक, शरद पवारांकडून मार्गदर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी काँग्रेसची पराभूत उमेदवारांसोबत बैठक, शरद पवारांकडून मार्गदर्शन

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कानमंत्र देत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची पराभूत उमेदवारांसोबत बैठक, शरद पवारांकडून मार्गदर्शन

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसनं आगामी ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कानमंत्र देत आहेत. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही बैठक सुरु झाली आहे. 

या बैठकीस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, राजेश टोपे असे बडे नेते आणि काही महत्त्वाचे मंत्री या बैठकीस उपस्थित आहेत. या बैठकीसाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाच बोलावलं आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या बैठकीच्या माध्यमातून उमदेवारांना मिळालेली मतं, त्यांचं मतदारसंघातील प्राबल्य, मतदारसंघात कमी मतदान मिळालेल्या भागातील पक्षाची स्थिती नेमकी कशी आहे, या उमेदवारांच्या पराभवाची कारणे आणि त्यावरील उपाय याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त आगामी निवडणुकांमध्ये या उमेदवारांची भूमिका काय असेल? याची चर्चाही या बैठकीत करण्यात येणार असल्यानं त्यानुषंगाने जबाबदाऱ्यांचं वाटपही करण्यात येईल असं म्हटलं जात आहे. तसंच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भातही शरद पवार आज सर्वांना मार्गदर्शन करणारेत.

हेही वाचा- ठाणे महानगरपालिका क्षेत्रात संचारबंदी, वाहनांची होणार कसून तपासणी 

दरम्यान आगामी निवडणुकांसाठी पक्षाची तयारी कशी असावी याबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेना, भाजप आणि काँग्रेस या पक्षानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीस सुरुवात केली. त्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षही तयारीला लागला आहे. 

Chief sharad pawar guide NCP lose candidates assembly loksabha elections