ठामपा शाळेतील विद्यार्थांना देण्यात येणाऱ्या चिक्यामध्ये आळ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shaley Poshan Aahar

ठामपा शाळेतील विद्यार्थांना देण्यात येणाऱ्या चिक्यामध्ये आळ्या

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहारापोटी देण्यात येणाऱ्या चिक्क्यामध्ये आळया आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या चिक्या पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याची सर्व देयके थांबवण्यात यावी अशी मागणी ठाणे शहर (जि) काँग्रेसने केली.

ठाण्यात महापालिकेच्या दोनशेच्यावर शाळा आहेत, या शाळेतील ४० हजार विद्यार्थ्यांना सकस आहारापोटी चिक्या दररोज दिला जात होत्या, कोविड कालावधीत शाळा बंद असल्याने त्याचा पुरवठा बंद झाला होता. यावेळी राजकीय हस्तक्षेप करून या चिक्यांचा आठवडय़ातून एकदा पुरवठा करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाने सुधारीत निर्णयाने घेतला.

हेही वाचा: राज्यसभा पोटनिवडणूक: देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेससमोर अट ठेवली?

वास्तविक याबाबत कालच्या स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक अॅड.विक्रांत चव्हाण यांनीही याबाबत विषय घेतला होता,सदरचा ठेका हाच बेकायदेशीररीत्या देण्यात आला असून अटीशर्तीनुसार देण्यात आलेला नाहीय असा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला आहे याचा स्व:ताचा कारखाना ठाण्यात असला पाहीजे होता. परंतु तो कारखाना प्रत्यक्षात सोलापूरमध्ये आहे, ठाण्यातील एका अनधिकृत बंगल्यावर या चिक्क्यांचा सर्व साठा ठेवण्यात येत असून या ठीकाणी स्वच्छतेबाबत आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्यामुळेच सदरची घटना घडली असल्याचा आरोप शहर काॅग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केला आहे.

या ठेकेदाराला ठीककीकाणच्या शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रवास शुल्क देण्यात येत आहे तेही बेकायदेशीर आहे. सदरची बाब आता समोर आली असून या चिक्क्यामध्ये आता चक्क आळया आढळून आल्या आहेत याबाबत आयुक्तांची भेट घेऊन या ठेकेदारावर त्वरीत गुन्हा दाखल करावा व त्याची देयके त्वरित रोखण्यात यावी अशी मागणी करणार असल्याची माहिती शहर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांनी दिली.

loading image
go to top