राज्यसभा पोटनिवडणूक: देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेससमोर अट ठेवली?

काँग्रेस नेत्यांच्या आजच्या लोटांगण प्रयत्नामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नाराज
Congress leader Nana Patole, Balasaheb Thorat And BJP Leader Devendra Fadanvis
Congress leader Nana Patole, Balasaheb Thorat And BJP Leader Devendra FadanvisTeam eSakal

मुंबई: राज्यसभा पोटनिवडणूक (Rajya Sabha election) बिनविरोध व्हावी, यासाठी राज्यातील काँग्रेस (congress) नेत्यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची भेट घेतली. काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव (rajiv satav) यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

काँग्रसेच्या उमेदवार रजनी पाटील यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी गुरुवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काँग्रेसने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन लोटांगण घातल्यामुळे महाविकास आघाडीतील इतर नेते नाराज झालेत.

Congress leader Nana Patole, Balasaheb Thorat And BJP Leader Devendra Fadanvis
डोंबिवलीत १५ वर्षीय मुलीवर २९ जणांनी केला बलात्कार

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यसभा पोट निवडणुक बिनविरोध करायची असेल तर त्या बदल्यात १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याची मागणी केली. काँग्रेस नेत्यांच्या आजच्या लोटांगण प्रयत्नामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नाराज असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झालीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com