ऑक्टोबरपासून लहान मुलांचं लसीकरण? कोविड टास्क फोर्स

corona vaccination
corona vaccinationsakal media

मुंबई : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा (Corona Third Wave) फटका लहान मुलांना अधिक बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यासाठी लहान मुलांचे लसीकरण (Child Vaccination) लवकर सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे. देशात येत्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लहान मुलांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात होऊ शकेल, असा विश्वास सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे (Maharashtra Covid Task Force) सदस्य डॉ. बकुळ पारेख (Dr.Bakul Parekh) यांनी व्यक्त केला आहे. ( Child Vaccination may start in October says Dr Bakul Parekh)

आत्तापर्यंत आपण 18 वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण करत आहोत. मात्र, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना होऊ शकणाऱ्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, जगभरात लहान मुलांच्या कोरोना लसीकरणासाठी चाचण्या सुरू आहेत, असेही डॉं बकुळ पारेख म्हणाले. अमेरिकेत फायझर कंपनीने 12 वर्षांवरील मुलांवर कोरोना लसीकरणाच्या चाचण्यांना सुरुवात केली आहे. भारतातही बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या चाचण्या बालकांवर सुरू आहेत. या चाचण्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.

corona vaccination
मुंबईच्या अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्लेत कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू

तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लहान मुलांचे कोरोना लसीकरण लवकरात लवकर करण्याचा विचार सरकारी पातळीवर सूरु आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लहान मुलांच्या कोरोना लसीकरणाला भारतात सुरुवात होऊ शकेल.तसेच गरोदर महिलांचेही कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, त्यालाही लवकरच सुरुवात होईल, असंही डॉ पारेख म्हणाले.

कोरोना काळात लहान मुलांचा आहार, मानसिक संतुलन, डेल्टा प्लस अशा विविध विषयांवरील लोकांच्या मनात शंका आहेत.या शंकांचे निरसन करण्यासाठी कोरोनाकाळात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी' या विषयावर डॉ. बकुळ पारेख यांनी संवाद साधला. खासदार राहुल शेवाळे आणि श्री राधा फाऊंडेशन आयोजित 'इन्फोडोस' या डिजिटल जनजागृती अभियानात ते बोलत होते. डॉ. पारेख यांच्या या विधानाने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com