मुंबईच्या अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्लेत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू

corona
corona sakal media

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट अंशत: (Corona Second Wave) ओसरली आहे असे संकेत आहेत. मात्र, मुंबईच्या के-पूर्व विभागात (Mumbai KE Zone) कोरोना संक्रमणाचा धोका गडद होत आहे. महानगरपालिकेच्या (BMC) कोरोना रुग्णांच्या मृतांच्या आकडेवारीतून (Corona Deaths) कोरोनाचा फटका के-पूर्व विभागाला अधिक बसल्याचं समोर आलं आहे. आत्तापर्यंत या विभागात तब्बल 45309 रुग्णांची नोंद (Corona Patient Update) करण्यात आली आहे. सध्याच्या ताज्या आकडेवारीनुसार, महानगरपालिकेच्या के-पूर्व विभागात कोरोना मृत्युंची संख्या अधिक आहे. अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अंधेरी पूर्व,जोगेश्वरी पूर्व आणि विलेपार्ले पूर्व या परिसराचा मुंबईच्या के-पूर्व विभागात समावेश आहे. या विभागात 1175 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर शहरात कोरोना मृतांचा आकडा 15451 वर पोहोचला आहे. (Corona Virus Most infected in Mumbai KE zone )

corona
कोविडच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत २५ टक्के मृत्यू

के-पूर्व विभागातून सर्वाधिक 53609 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीय. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या 7.22 लाखांवर पोहोचली आहे. त्यापाठोपाठ मुंबईच्या (S) विभागात 977 करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भांडूप,पवई,कांजूरमार्ग,विक्रोळी आणि नाहूर क्षेत्राचा या मुंबईच्या (S) विभागात समावेश आहे. अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईच्या (Rc) विभागातून बोरीवली परिसरातून 951 कोरोना रुग्णांच्या मृत्युची नोंद करण्यात आलीय. कोरोना मृतांच्या आकडेवारीत तिसऱ्या स्थानावर या विभागाची नोंद झालीय. तर (PN) विभागातून 936 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.या विभागात मालाड, मार्वे, मनोरी, अक्सा आणि मढ हा परिसर आहे.

corona
MPSC विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर फडणवीसांची प्रतिक्रिया

"या विभागांमध्ये विशेष आरोग्य सुविधा देण्याकडे आमचं लक्ष आहे. येथील नागरिक कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करतात की नाही याचीही आम्ही खातरजमा करत आहोत. नागरिक मास्क घालतात की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी क्लीन अप मार्शल तैनात करण्यात आले आहेत. तसेच विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई देखील क्लीन अप मार्शल करत आहेत,'' अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.

कोरोनाची सर्वाधिक झळ बसलेल्या KE विभागातून एकूण 51 हजार 612 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. RC विभाग 48473, तर KE विभागातील 43370 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. शहरात 8351 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये KW विभागातून 973, RC विभागातून 622 आणि KE विभागाच्या 560 रुग्णांचा समावेश आहे. B विभागात 3868 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीय. इतर विभागाच्या तुलनेत ही रुग्णसंख्या कमी आहे. मस्जिद बंदर, मोहम्मद अली रोड, डोंगरी आणि भेंडी बाजार या परिसराचा या विभागात समावेश आहे. तर कुलाबा , चर्चगेट, नेव्ही नगर या क्षेत्राचा A विभागात येतात. 174 कोरोना रुग्णांचा मृत्यू या विभागात झाला आहे.

शहरात सरासरी 600 ते 700 कोरोना रुग्णांचे निदान होत आहे. उन्हाळ्यात 10000 ते 11000 कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. मात्र, आता हा आकडा घसरला आहे. महापालिकेने आत्तापर्यंत 71 लाख कोरोना चाचण्या केल्या आहेत. यामध्ये 70 % अँटीजेन आणि उर्वरित आरटीपीसीआर चाचण्यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com