मुंबई : उद्यापासून पालिकेच्या सर्व केंद्रांवर मुलांचे लसीकरण

corona vaccination
corona vaccinationsakal media

मुंबई : मुंबईत १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी (children vaccination) पालिकेच्या केंद्रांची संख्या वाढवली (corona vaccination center) जाणार असून सोमवारपासून सर्व १८१ केंद्रांवर बालकांना लसीकरण करता येणार आहे. यामुळे लसीकरणाला चांगला वेग येणार आहे. सध्या १२ केंद्रांवर लसीकरण (corona vaccination) केले जात होते. १६ मार्चपासून मुंबईसह (Mumbai) देशभरात १२ ते १४ वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू झाले आहे. त्यांच्या लसीकरणासाठी, पालिकेने सुरुवातीला १२ केंद्रांवर व्यवस्था केली होती.

corona vaccination
High Court: दत्तक मुलगा आईची जात लावू शकतो!

आता सोमवारपासून त्याचा विस्तार करण्यात येत आहे. पालिका आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, सध्या मुंबईत १८१ पालिका आणि १८ सरकारी लसीकरण केंद्रे कार्यरत आहेत. सोमवारपासून पालिका सर्व १८१ केंद्रांवर मुलांचे लसीकरण सुरू करणार आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, पालिकेकडे कॉर्बेव्हॅक्स लशीचे एक लाख २० हजार डोस आहेत. हे सर्व डोस सोमवारी सर्व केंद्रांवर वितरित केले जातील, ज्यामुळे मुलांना सर्व केंद्रांवर लसीकरण करता येईल. प्रत्येक लसीकरण केंद्रांवर हजार डोस देण्यात आले आहेत.

मुंबईतील साडेपाच लाख मुले लाभार्थी

राज्यातील ६४ लाख बालके या लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यापैकी ५.५ लाख बालके मुंबईतील आहेत. गेल्या चार दिवसांत मुंबईतील १,५७९ मुलांनी लशीचा पहिला डोस घेतला. पहिल्या तीन दिवसांत त्यांच्या लसीकरणाचा आलेख कमी असून तो वाढवण्यावर पालिका आता प्रयत्नशील आहे. दरम्यान, शनिवारी १२ ते १४ वयोगटातील १,०३० मुलांना लसीकरण केले गेले.

शिबिरांतूनही लसीकरण

परीक्षा असल्याने मुले लसीकरणासाठी येत नसल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले. अनेक शाळांमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परीक्षा असणार आहेत. परीक्षा संपल्यानंतर शाळांमध्ये लसीकरण शिबिरे आयोजित करण्याची पालिकेची योजना आहे. काकाणी यांच्या म्हणण्यानुसार, परीक्षा संपल्यानंतर मुले निकाल घेण्यासाठी आणि इतर कामांसाठी शाळेत पोहोचतात, अशा वेळी शाळा व्यवस्थापकांच्या मदतीने लसीकरण शिबिरे आयोजित केली जातील.

नागरिकांमध्ये या लसीबाबत जास्त जागरुकता नसावी किंवा लस नवीन असल्यामुळे पालकांमध्ये ती द्यावी की नाही याबाबत विचार सुरू असेल. प्रत्येक केंद्रावर हजार डोस देण्यात आले आहेत. डोस पुरवठ्याविषयी काळजी नसून आता फक्त लाभार्थींनी लस घेण्यासाठी केंद्रापर्यंत पोहोचावे.

- डॉ. अभिराम कसबे, लसीकरण नोडल अधिकारी, नायर रुग्णालय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com