High Court: दत्तक मुलगा आईची जात लावू शकतो!

दोन आठवड्यात जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत
Mumbai High Court
Mumbai High CourtSakal media

मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका आदेशात दत्तक मुलाला अविवाहीत आईच्या जातीचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रमाणपत्र दोन आठवड्यात द्यावे असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

Mumbai High Court
Relationship Tips : ही पाच कारणे टाळा! संसार सुखाचा करा

मुंबईच्या ताडदेव भागातील अनाथाश्रमातून या महिलेने एका मुलाला दत्तक घेतले. तेव्हा मुलाचे नाव पप्पू होते. त्याची त्याच्या जैविक पालकांशी ओळख पटलेली नव्हती. त्यामुळे या महिलेने प्रक्रियेनुसार, जन्न नोंदणीसाठी महापालिकेकडे अर्ज केला होता. २०१० साली तिला त्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. ज्यामध्ये महिला त्याची आई असल्याचे म्हटले होते. मात्र जातीविषयी काही उल्लेख नव्हता.

Mumbai High Court
आम्हाला मुलबाळ नकोच... का म्हणतात महिला असं!

ही महिला हिंदू माह्यवंशी या अनुसूचित जाातीमधील असल्याने तिने मुलाचे जात प्रमाणपत्र देण्यासाठी उपजिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज केला. पण, प्राधिकरणाने, २०१६ मध्ये मुलाच्या वडिलांच्या जातीची कागदपत्रे सादर केली नसल्याने सांगत अर्ज फेटाळला. त्यामुळे मुलाला जात प्रमाणपत्र मिळाले नव्हते. महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली. तेथे अॅड प्रदीप हवनूर यांनी महिलेची बाजू मांडली. ती एकटी आई असल्याने तिचा दत्तक मुलगा तिची जात घेईल, असे तिचे म्हणणे होते. ज्या अधिकाऱ्यांनी मुलाला जात प्रमाणपत्र नाकारले, त्यांनी दिलेला आदेश बेकायदेशीर असल्याचे तिने सांगितले.

Mumbai High Court
तुमची पाळी अनियमित येतेय? ही आहेत कारणे

न्यायमूर्ती बी एस शुक्रे, न्यायमूर्ती जी ए सानप यांच्या खंडपीठाने वस्तुस्थिती जाणून घेत मुलाच्या वडिलांच्या जातीची कागदपत्रे मिळविण्याचा कोणताही प्रश्न नाही. अधिकाऱ्यांनी आईच्या जातीचे प्रमाणपत्र मुलाला दोन आठवड्यात द्यावे, असे आदेश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com