esakal | कोरोनाचा बालकांच्या मानसिकतेवर 'असा' झाला परिणाम, जाणून घ्या सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

children

कोरोनाचा बालकांच्या मानसिकतेवर 'असा' झाला परिणाम, जाणून घ्या सविस्तर

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : कोविडबद्दल (Corona Virus) मनात असलेला संभ्रम, शिवाय लादलेले निर्बंधामुळे लहान मुले (Children) बिथरली आहेत. 22 टक्के मुले नैराश्यतेतुन (Depression) कोविड भीतीच्या छायेत असून 41 % मुलांमध्ये कोविडचा धाक (Covid Fear) निर्माण झाला आहे. त्यामुळे, मुलांच्या वागणूकीतला बदल ओळखून उपचारांची गरज असल्याचे मत मानसोपचार(Psychologist) तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. (Children Need Treatment seeing their behavior of corona fear says psychologist-nss91)

ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ने केलेल्या अभ्यासानुसार, किमान 22.5 टक्के मुलांमध्ये कोविड -19 ची भीती निर्माण झाली असून 42.3 टक्के मुलं चिडचिडेपणा आणि दुर्लक्षितपणामुळे त्रस्त असल्याचे समोर आले आहे. साथीचे रोग, पौगंडावस्थेतील मुले आणि चिंतीत मुलांवर कोविड -19 मुळे सुरु असलेल्या लॉकडाउनचा तसेच अलगीकरणाचा मानसिक आणि वर्तणुकीवर परिणाम दिसून येत आहे. तर, दीड ते दोन वर्षांच्या लहान मुलांवर त्यांच्या आजूबाजूच्या बदलांची जाणीव झाल्याने परिणाम होत असल्याची नोंद अभ्यासात करण्यात आली आहे. या अभ्यास अहवालात 22,996 मुले आणि 219 पौगंडावस्थेतील मुलांचा अभ्यास करण्यात आला. एकंदरीत 34.5 टक्के, 41.7 टक्के, 42.3 टक्के आणि 30.8 टक्के मुले अनुक्रमे चिंता, नैराश्य, चिडचिड आणि दुर्लक्षांमुळे त्रस्त असल्याचे आढळून आले आहे. तर, मुलांमध्ये अलिप्त राहिल्याने अनुक्रमे 52.3 टक्के आणि 27.4 टक्के काळजी घेणाऱ्याना चिंता व नैराश्याचा त्रास झाला असल्याचे समोर आले.

हेही वाचा: डोंबिवलीतील नाला झाला चक्क हिरवा

यावर बोलताना वोक्हार्ट रुग्णालयाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मलिक मर्चंट यांनी सांगितले की, बहुतांश मुलांना कोविडमुळे चिडचिड दिसून आली. मुंबईत पहिल्या लाटेत त्याचे प्रमाण जास्त दिसून आले. तसेच, दुसऱ्या लाटेमध्ये दिल्लीतील मुलांमध्ये चिडचिड जास्त दिसून आली होती. मात्र, दुसऱ्या लाटेमध्ये मुंबईत हे प्रमाण कमी दिसून आले. चिडचिड झाल्याने मुलं खूप घाबरलेली असायची. त्यातल्या काही मुलांमध्ये ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डरची लक्षण दिसून आली. म्हणजे, हात जास्त स्वछ धुणे, खूप मोठ्या प्रमाणावर काळजी घ्यायची, घरातून बाहेर निघायचे असल्यास ग्लोज घालून बाहेर पडायचे आणि खूप मोठ्याप्रमाणावर भीती निर्माण झाली होती त्यात कोणी घरात आलं किंवा कोणती वस्तू बाहेरून घरात आणली वगैरे तर सॅनिटाईझ करायचे. या अती घाबरण्यातून  थोडाफार ताप, खोकला, किंवा अशक्तपणा आल्यास कोविड झाला आहे का? आणि रुग्णालयात नेणार का? असे प्रश्न मूल विचारत असल्याचे डॉ. मलिक मर्चंट म्हणाले.

पालकांचा मुलांसोबत संवाद महत्वाचा

पालकांचा मुलांसोबत संवाद महत्वाचे असून अधिक मुक्त संवाद करण्याचे मानसोपचार तज्ज्ञ सुचवतात.  मुलांना त्यांच्या वयानुसार, त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. हा आजार नक्की काय आणि आपण किती आणि कशी काळजी घ्यायची हे त्यांना समजावून सांगितले गेले पाहिजे. जर पालकांना यासंदर्भातील माहिती नसल्यास डॉक्टरांमार्फत याविषयी बोलून मार्गदर्शन घेतले पाहिजे. दुसरी आणि तिसरी लाट लक्षात घेता कोविड संदर्भातील आपला स्वभाव आणि दृष्टीकोन निश्चित करून त्यासारखे वागणे अपेक्षित आहे. मूल बाहेर जात असल्यास  कोविड प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी असे सांगून मुलांचा आत्मविश्वास वाढवावा, असा सल्ला  तज्ज्ञ देतात. तर, नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वाणी कुलहाली यांनी सांगितले की, तिसरी लाट अजून सुरु झाली नसून तशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरी लाट अजून संपलेली नाही. एम्सच्या अभ्यासानुसार, डॉक्टरांचे मार्गदर्शन, संवाद साधा असे सुचवले आहे.  

34 टक्के मुलांवर काहीच फरक नाही

चीडचीड किंवा नैराश्य हे बदलत्या स्थितीवर साधी प्रतिक्रिया असते. ही महामारी सर्वासाठी नवीन आहे. या अभ्यासात असेही म्हटले आहे की, या सर्व गोष्टींचा 34 टक्के मुलांवर काहीच फरक पडला नाही. 31 टक्के मुलांचे वागणे सुधारले आहे म्हणजे जवळपास 65 टक्के मुलांवर याचा परिणाम झाला नाही. उर्वरित 44 टक्के चिडचिड आणि 20 टक्के नैराश्येत दिसून आले. त्यातून घाबरण्याचे कारण नाही असेही डॉ कुलहाली यांनी सांगितले.

loading image