esakal | डोंबिवलीतील नाला झाला चक्क हिरवा
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवलीतील नाला झाला चक्क हिरवा

डोंबिवलीतील नाला झाला चक्क हिरवा

sakal_logo
By
शर्मिला वाळूंज

डोंबिवली: डोंबिवली (dombivali) एमआयडीसीतील (Midc) रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे (chemical pollution) यापूर्वी हिरवा, नारंगी पाऊस, त्यानंतर रसायनामुळे गुलाबी, निळे झालेले रस्ते यापूर्वी पाहीले आहेत. सोमवारी पडलेल्या पावसामुळे नाले (nullah) तुडुंब भरून वाहत असून नांदीवली नाला चक्क हिरवा झाल्याचे पहायला मिळाले. पावसाचा फायदा घेत कंपन्यांनी आपले रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडल्याने पूर्ण नाला हिरवा झाला होता. (Nullah turns into green at dombivali dmp82)

डोंबिवली औद्योगिक विभागात रासायनिक कंपन्या सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता तसेच नाल्यात सांडपाणी सोडत असल्याने वारंवार वायू प्रदूषणचा त्रास येथील निवासी भागातील नागरिकांना होत असतो. यापूर्वी 2017 ला डोंबिवलीत हिरवा ऑईल मिश्रित पाऊस पडला होता. तर फेब्रुवारी 2020 गुलाबी रस्ता पहायला मिळाला होता. मध्यंतरी नारंगी पाऊस, निळे झालेले रस्तेही डोंबिवलीकरांनी अनुभवले.

हेही वाचा: 'सामना'मध्ये हेडलाईन येईल "आमचीच लाल आमचीच लाल"; मनसेचा टोला

गेल्या 2 दिवसंपासून जोरदार पाऊस पडत असल्याने नांदीवली नाला हा भरून वहात आहे. याचाच फायदा घेत सोमवारी एमआयडीसीतून नाल्यात केमिकल सोडण्यात आले. त्यामुळे नाल्यातील पाण्याला हिरवा रंग आला होता, तसेच उग्र वासही येत असल्याने नागरिक हैराण झाले होते. सकाळी 9 ते 10 या वेळेत हे हिरवे पाणी वहात होते.

हेही वाचा: घरातच पाण्यातून शॉक लागून महिलेचा मृत्यू, वांद्रयातील घटना

सकाळी 9 च्या दरम्यान नाल्यातील पाणी गडद हिरवे झाले होते. त्याविषयी आम्ही लगेच fb वर पोस्ट केली असता 10 नंतर पाण्याचा रंग साधारण झाला. वारंवार कामा संघटना, प्रदूषण मंडळ याना रहिवासी तक्रार करतात पण ही समस्या काही कमी झालेली नाही. शाळेतील मुले, रहिवाशांनी आणखी किती दिवस या नाल्याचा व त्यात सोडल्या जाणाऱ्या केमिकलचा त्रास सहन करायचा असे नागरिक राहुल कुलकर्णी व शशिकांत कोकाटे यांनी सांगितले.

याची माहिती मिळताच मनसे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विट करीत याची माहिती दिली. गांधीनगरचा हा नाला बंदिस्त करावा किंवा पाईपलाईन द्वारे केमिकलयुक्त पाणी सोडण्यात यावे. याविषयी वारंवार पाठपुरावा करूनही काही होताना दिसत नाही असे त्यांनी म्हटले आहे.

"प्लॉट नं. W 243 रायबो फेम या कंपनीने पाणी सोडले असल्याने हे प्रदूषण झाले. एमआयडिसीतील अधिकाऱ्यांशी बोललो त्यांनी त्यांचे पाणी कट केले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाशीही बोलणे झाले असून त्यांना सक्त कारवाई करण्याची विनंती केली आहे" - डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका

loading image