esakal | राज्यातील 10 वर्षापर्यंतच्या तब्बल 1 लाख 95 हजार बालकांना कोरोना!
sakal

बोलून बातमी शोधा

child corona

राज्यातील 10 वर्षापर्यंतच्या तब्बल 1 लाख 95 हजार बालकांना कोरोना!

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) लहान मुलांना (Children) अधिक बाधित करू शकते असा तज्ज्ञांचा इशारा असताना ती सुरु होण्यापूर्वीच लहान मुलांमध्ये कोरोना वाढत (Corona Infection) असल्याचे चित्र आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अहवालानुसार, 13 जुलैपर्यंत 0 ते 10 या वयोगटातील 1 लाख 95 हजार 109 एवढी लहान मुले कोरोनाच्या विळख्यात आली आहे. तर, त्यापाठोपाठ 21 ते 30 या तरुण गटातील (youngster) नागरिकांची संख्याही बाधितांमध्ये जास्त आहे. 21 ते 30 या वयोगटातील 11 लाख 10 हजार 736  तरुण बाधित झाले आहेत. त्यामुळे, राज्यातील या वयोगटाच्या एकूण लोकसंख्येपैकी (Total Population) जवळपास 5.19 टक्के लोकसंख्या बाधित झाल्याचे स्पष्ट होत आहे. ( Children up to years infected by corona before Third wave says a report)

दरम्यान, 0 ते 10 वयोगटातील लहान मुलांची संख्या लवकरच 2 लाखांचा टप्पा पार करेल असे आकडेवारीवरुन स्पष्ट होते. सध्या या वयोगटातील बाधितांचे प्रमाण 3.12 टक्के आहे. दरम्यान, मे आणि जून महिन्याच्या जुलै महिन्यात बाधितांची संख्या वाढली आहे. तर, एक महिन्यापूर्वी म्हणजेच 13 जून या दिवसांपर्यंत 1 लाख 84 हजार 220 एवढे 0 ते 10 वयोगटातील बाधित होते. त्यात एका महिन्यात 10 हजारांनी ही संख्या वाढली आहे. तर, 13 मे या दिवशी 1 लाख 58 हजार 660 एवढी संख्या होती. ज्यात एका महिन्यात 25 हजार 560 नव्या बाधितांची भर पडली. या तिन्ही महिन्याची आकडेवारी पाहिली असता 0 ते 10 या वयोगटातील लहान कोरोना बाधितांचे प्रमाण वाढलेले दिसते.

हेही वाचा: 8 कोटींच्या कारचा मालक असलेल्या शिवसैनिकावर 35 हजाराच्या वीजचोरीचा आरोप

तरुणांचे वाढते प्रमाण

21 ते 30 वयोगटातील 13 जुलै 2021 पर्यंत 11 लाख 10 हजार 736 एवढ्या तरुणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर, जून महिन्यात ही संख्या 10 लाख 62 हजार 393 एवढी होती. जून महिन्यात यात 48 हजार 343 नव्या बाधितांची भर झाली असून या वयोगटातील बाधितांनी 11 लाखांचा टप्पा पार केला आहे. याचे प्रमाण 17.98 टक्के एवढे आहे.

तीन महिन्यांत वाढलेली संख्या (10 वर्षांपर्यंत)

13 मे - 1 लाख 58 हजार 660

13 जून - 1 लाख 84 हजार 220

13 जुलै - 1 लाख 95 हजार 109

तीन महिन्यांत वाढलेली संख्या (21 ते 30 वयोगट)  

13 मे - 9 लाख 25 हजार 353

13 जून - 10 लाख 62 हजार 393

13 जुलै - 11 लाख 10 हजार 736

ऑक्टोबरमध्ये पार केला 50 हजारांचा टप्पा

तर, गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये 0 ते 10 वयोगटातील बाधितांची संख्या ही फक्त 51 हजारांच्या घरात होती. ती आता 2 लाखांचा टप्पा गाठेल. वैद्यकीय विक्षण व औषधी द्रव्ये विभाग सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार, लहान मुलांचे कोरोना बाधित होण्याचे प्रमाण जरी वाढत असले तरी त्यांचा मृत्यू दर तुलनेने कमी आहे. त्यामुळे ही एक दिलासादायक बाब असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

loading image