डोंबिवली - पतीने सोडून दिले, पदरात चार मुले...मूलांचा सांभाळच नाही तर त्यांच्या शिक्षणाची देखील चिंता मुलांच्या आईला सतावू लागली. हाताला मिळेल ते काम ती करत होती. पण काही केले तरी पैशाचे सोंग आणता येत नाही हे तिला जाणवू लागले. त्यातच आजाराने तिला ग्रासले, कल्याण मध्ये भावाचा आसरा तिने घेतला.