esakal | चीनसोबत तणावाचा शेअर बाजारावर परिणाम; झालीये इतकी घसरण!
sakal

बोलून बातमी शोधा

चीनसोबत तणावाचा शेअर बाजारावर परिणाम; दोन टक्‍क्‍यांनी घसरण

लडाख सीमेवर चीनबरोबर नव्याने निर्माण झालेला तणाव आणि मार्जिनसंदर्भातील नव्या नियमांमुळे आज शेअर बाजारात घबराट पसरली. गुंतवणूकदारांनी तुफानी विक्री केल्याने शेअर बाजार दोन टक्‍क्‍यांहूनही जास्त घसरला. मुंबई शेअर बाजार 839 अंशांनी घसरून 38,628 अंशांवर; तर राष्ट्रीय शेअर बाजार 260 अंशांनी घसरून 11,387 अंशांवर बंद झाला. 

चीनसोबत तणावाचा शेअर बाजारावर परिणाम; झालीये इतकी घसरण!

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : लडाख सीमेवर चीनबरोबर नव्याने निर्माण झालेला तणाव आणि मार्जिनसंदर्भातील नव्या नियमांमुळे आज शेअर बाजारात घबराट पसरली. गुंतवणूकदारांनी तुफानी विक्री केल्याने शेअर बाजार दोन टक्‍क्‍यांहूनही जास्त घसरला. मुंबई शेअर बाजार 839 अंशांनी घसरून 38,628 अंशांवर; तर राष्ट्रीय शेअर बाजार 260 अंशांनी घसरून 11,387 अंशांवर बंद झाला. 

ही बातमी वाचली का? कोव्हिड-19 चाचण्या वाढवण्यासाठी ठाणे पालिका राबवणार 'ही' विशेष योजना

आजच्या मोठ्या घसरणीमुळे शेअर बाजारांमधील सहा दिवसांच्या तेजीमध्ये आज खंड पडला. आज सकाळी बाजार सुरू झाल्यावर मुंबई शेअर बाजार सुमारे पाचशे अंश वर गेला; पण चाळीस हजार अंशांना स्पर्श केल्यावर तेथून मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू झाली. त्यातून निर्देशांक दिवसभरात सावरलेच नाही. सेन्सेक्‍सने 39 हजारांची, तर निफ्टीने 11 हजार 400 ची पातळीही खालच्या दिशेने तोडली. हा महिनाभर खरेदी करणाऱ्या परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आज तीन हजार 395 कोटी रुपयांचे समभाग विकले. देशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 680 कोटी रुपयांची खरेदी केली. 

ही बातमी वाचली का? राष्ट्रपती भवनातील शेवटची चोरी; प्रणव मुखर्जींच्या एका शब्दाने 'त्याचे' आयुष्य बदलले 

मुंबई शेअर बाजार निर्देशांकाचे मूल्य ठरविणाऱ्या प्रमुख तीस कंपन्यांपैकी आज फक्त ओएनजीसी, टीसीएस, एचडीएफसी बॅंक यांचे समभाग किरकोळ वाढ घेत बंद झाले. अन्य 27 समभागांच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली. सर्वांत जास्त घसरण सन फार्मामध्ये (6.71 टक्के) झाली. 37 रुपयांची घट दाखवून तो 518 रुपयांवर बंद झाला. बजाज फिनसर्व्ह 356 रुपयांनी पडून 6,187 रुपयांवर, तर बजाज फायनान्स 182 रुपयांनी घसरून 3489 रुपयांवर बंद झाला. कोटक बॅंक 65 रुपयांनी (बंद भाव 1402 रु.) व इंडस्‌इंड बॅंक 26 रुपयांनी (630 रु.) घसरला. लार्सन अँड टुब्रो (945 रु.), मारुती (6,837), आयसीआयसीआय बॅंक (395) व टाटास्टील (413) यांचेही भाव घसरले. 
---------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

loading image