कोरोनाबद्दलचे संवेदनशील सत्य चीन लपवतंय? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

कोरोना सारख्या महाभयंकर रोगाची लागण झालेल्या रुग्णांकडे चीनी सरकारचे दुर्लक्ष, जगासमोर मांडणारा पत्रकार चेन क्‍यूइशी अचानक बेपत्ता झाला आहे. या पत्रकाराच्या बेपत्ता झाल्याने कोरोना विषाणू प्रकरणाचे काहीतरी संवेदनशील सत्य चीन लपवत असल्याची चर्चा जगात सुरू झाली आहे. 

 पांढऱ्या पॅंटवरून मुंबई पोलिसांनी असं पकडलं पाकिस्तानी तस्कराला

कोरोना विषाणूसंदर्भात चीनी सरकारला सर्वात आधी गंभीर इशारा एका डॉक्‍टरने दिला होता. त्या डॉक्‍टरचा मृत्यू झाल्याची माहिती चेन क्‍यूइशी या पत्रकाराने प्रसिद्ध केली होती. हा पत्रकार मानवाधिकार कार्यकर्ता असल्याचेही बोलले जात आहे. गुरूवारी रात्रीपासून या पत्रकाराशी घरच्यांचा तसेच मित्रांचा संपर्क होऊ शकला नाही. वुहानमध्ये थैमान घालणाऱ्या या विषाणूचे वार्तांकन करीत अनेक व्हिडीओ त्याने समाजमाध्यमांवर पोस्ट केले होते. या वार्तांकनात चीनी सरकारची या गंभीर आजाराबाबतची हलगर्जी समोर आली होती. ग्राऊंड लेव्हलवर असलेल्या भयाण परिस्थितीचे वार्तांकन त्यांनी केले होते. हे वार्तांकन जगासमोर आल्यानंतर सरकारकडून त्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतरही क्‍यूइशी यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपले वार्तांकन प्रसिद्ध करत होते. क्‍यूइशी गुरूवारी रुग्णालयात गेले होते, त्यानंतर ते पुन्हा घरी आले नसल्याची माहिती त्यांच्या कुटूंबाने दिला आहे. 

प्रेमाला बहर द्यायचा असेल तर राशीनुसार द्या या रंगाचा टेडी

या विषाणू बाबत सरकारला आधीच इशारा देणाऱ्या डॉ. ली वेनलियांग यांचाही मृत्यू गुरूवारीच झाला आहे.  त्यामुळे या कोरोना बाबत नेमके कोणतेतरी संवेदनशील सत्य चीनी सरकार लपवत असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. वेलियांग यांनी हा विषाणू वेगाने पसरत असल्याची माहिती आपल्या संपर्कातील अनेकांना दिली होती. परंतु सरकारने त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याचे क्‍यूइशी यांनी सांगितले होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China is hiding sensitive truths about Corona