esakal | "संजय राऊत, तुम्हीही हे ध्यानातच ठेवा..."; चित्रा वाघ भडकल्या
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra-Wagh-Sanjay-Raut

"संजय राऊत, तुम्हीही हे ध्यानातच ठेवा..."; चित्रा वाघ भडकल्या

sakal_logo
By
विराज भागवत

'चमचेगिरी आणि सामनाचे संपादक' असे शब्द वापरत राऊतांना लगावला टोला

मुंबई: शिवसेना आणि नारायण राणे या दोघांचे नातं साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सुरूवातील कट्टर शिवसैनिक असणारे राणे आता शिवसेनेचे कट्टर विरोधक आहेत. नुकतेच राणे यांना केंद्रिय मंत्रिपद मिळालं. पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटमध्ये त्यांना सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचा कार्यभार सोपवण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना, 'राणेंची राजकीय कारकिर्द पाहता त्यांना छोटं खातं दिलं', असं खोचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. तसेच, प्रकाश जावडेकरांसारखा ज्येष्ठ व अनुभवी मोहरा पडल्याचं आश्चर्य व्यक्त करत स्मृती इराणी यांचे मंत्रिपद काय राहिल्याबद्दल त्यांनी तिरक्या शब्दात मत मांडलं. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशच्या उपाध्यक्षा आणि भाजप महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना सक्त ताकीद दिली. (Chitra Wagh BJP gives Warning to Sanjay Raut over Female Self Respect Issue)

हेही वाचा: दीराने विधवा वहिनीच्या चेहऱ्यावर फेकलं अ‍ॅसिड, घाटकोपरमधील घटना

संजय राऊतांना थेट 'वॉर्निंग'

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिग्गज मंत्र्यांचे राजीनामे घेतले. त्यात प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्ष वर्धन यांचा समावेश होता. अशा ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना मंत्रिपदावरून दूर केलं असताना स्मृती इराणी यांना मंत्रिपदावर कायम कसं कायम ठेवलं? यावर संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे खुलासा मागितला होता. यावर उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या, "आपण जे काल स्मृती इराणींबद्दल जे बरळलात… मुळात पहिले तुमच्या चमचेगिरीचा आणि 'सामना'च्या संपादकपदाचा काय संबंध आहे?? ते सांगा. मग मी तुम्हाला त्यांचा आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत खुलासा देईन. आणि आपणास एक स्पष्ट सांगायचे आहे की संजय राऊतजी, भाषणात महिलांची तुलना करताना भान ठेवा. अन्यथा आम्हा महिलांनाही आमचा सन्मान राखण्यासाठी 'आरे ला कारे' करण्याची भाषा वापरता येते.

हेही वाचा: BMCच्या शिपायांची पत्नीच्या नावे कंपनी; लाटली कोट्यवधींची कामं

"संजय राऊत कधी नव्हे ते खरे बोलले. नारायण राणे यांच्या कर्तृत्वाची उंची खूप मोठी आहे. ती उंची वाढतच राहणार आहे. म्हणूनच शिवसेनेला ते झेपलं नाही. असो मी पण अपेक्षा करते की आपल्या बंधूंना (सुनील राऊत) लवकरच मंत्रीपद मिळेल, जेणेकरून आपल्यालाही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आभार मानण्याचे सौभाग्य प्राप्त होईल", असा खोचक टोलादेखील चित्रा वाघ यांनी राऊतांना लगावला.

loading image