
विरार : जूनच्या १ तारखेपासून समुद्री मासेमारीला बंदी असल्याने वसईतील बाजारपेठा सध्या खाडीतील आणि तलावातील माशाने भरलेल्या दिसत आहेत. त्यातही फक्त पावसाळ्याच्या हंगामात मिळणाऱ्या ‘चिवणी’ या छोट्या पण रुचकर माशाला सर्वाधिक मागणी आहे. मात्र या माशाची आवक कमी झाल्याने त्याचे दर वाढले गेले आहेत. यामुळे खवय्यांच्या खिशाला मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे.