esakal | Mumbai Traffic Updates : ट्रॅफिक जामने केला मुंबईकरांचा मूड ऑफ, मुंबईच्या वेशीवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Traffic Updates : ट्रॅफिक जामने केला मुंबईकरांचा मूड ऑफ, मुंबईच्या वेशीवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी

मुंबईच्या वेशींवर आज वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आहे. आज सकाळपासून मुंबईच्या वेशीवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली.

Mumbai Traffic Updates : ट्रॅफिक जामने केला मुंबईकरांचा मूड ऑफ, मुंबईच्या वेशीवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबईः आज ख्रिसमसचा दिवस. त्यात शुक्रवार आल्यानं सलग तीन दिवस सुट्टीचे आलेत. त्यामुळे मुंबईच्या वेशींवर आज वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आहे. आज सकाळपासून मुंबईच्या वेशीवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. शहरातल्या टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. 

मुंबई पुणे जामच जाम 

सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे नागरिक आपल्या कार्स घेऊन मुंबईकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडलेत. लोणावळा, खंडाळा आणि पुण्याच्या दिशेने नागरिक निघाल्यामुळे मुंबईचा एक्झिट पॉईंट खालापूर या भागात पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीये. वाहतूक कोंडीमुळे पर्यटनासाठी निघालेल्या प्रवाशांची काहीशी निराशा झालीये. 

मुंबई नाशिक हायवेवर वाहतूक कोंडी

सलग तीन दिवस सुटी आल्याने मुबंई नाशिक महामार्गावर गाड्यांच्या रंगा लागल्या आहेत. त्यातच मुबंईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या जुन्या कसारा घाटात वाहातूक कोंडी झाली आहे. एकामागे एक अनेक छोट्या मोठ्या गाड्यांच्या रांगा लागल्याने मुबंई नाशिक महामार्गावर नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. 

अधिक वाचा-  ठाण्यात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग मंदावला, शहरात केवळ दिड टक्के रुग्ण

मुंबई गोवा हायवे जाम

मुंबई गोवा हायवेवर वडखळ बायपास मार्ग ते पोयनाडपर्यंत वाहतुक कोंडी आहे. तर अलिबागकडे जाणाऱ्या मार्गावर तब्बल 3किलोमीटरपर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्यात. पेणच्या पुढे वडखळला जाणाऱ्या बायपास मार्गाच्या पुलावर तसेच अलिबाग एक्झिटवर प्रचंड प्रमाणात वाहतुक कोडी पाहायला मिळतेय. ख्रिसमस आणि लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात नागरिक शहराबाहेर पडतायत. मात्र एक ते दोन तासांच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक चांगलेच कावलेत.

ठाण्याच्या वेशीवर अभुतपूर्व ट्रॅफिक जाम 

मुंबईतल्या वाशी, ऐरोली, मुलुंड, दहिसर टोल नाक्यांवर जशा वाहनांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळाल्या. तशाच मोठ्या रांगा ठाणे जिल्ह्यातील कल्याण शिळफाटा तर भिवंडी मार्गावर देखील पाहायला मिळाल्यात. नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांमुळे या ठाणे आणि कल्याणमध्ये वाहतूक कोंडी झाली. जवळपास २ किलोमीटरपर्यत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कल्याण ते शिळफाटा या ३० मिनिटांचे अंतर कापण्यासाठी दोन तास लागत आहेत. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

फास्ट टॅग प्रणालीमुळे ट्राफिक जाम 
 
देशभरातील टोल नाक्यांवर वेळ वाचविण्यासाठी फास्टॅग प्रणाली वर्षभरापूर्वीपासून बंधनकारक करण्यात आली होती. मात्र, एकाचवेळी एवढे फास्टॅग मिळविणे आणि त्या प्रणालीतील दोष पाहून सरकारने ही मुदत काहीवेळा वाढविली होती. आता १ जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. आज मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडलेत. मात्र सर्वांकडे अजूनही फास्ट टॅग नसल्याने वाशी टोलनाक्यावर मोठी वाहतूक कोंडी झालीये.

Christmas Mumbai traffic alert slow moving toll plaza