esakal | ठाण्यात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग मंदावला, शहरात केवळ दिड टक्के रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग मंदावला, शहरात केवळ दिड टक्के रुग्ण

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असल्याची बाब समोर आली आहे.

ठाण्यात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग मंदावला, शहरात केवळ दिड टक्के रुग्ण

sakal_logo
By
राजेश मोरे

मुंबईः  गेल्या काही दिवसांपासून दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असली तरी ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असल्याची बाब समोर आली आहे. शहरात आतापर्यंत 96.21  टक्के रुग्ण बरे झाले असून शहरात केवळ 1.53 टक्के रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील रुग्ण दुपटीचा कालावधी 428 दिवसांवर आला आहे. कोरोना रुग्ण संख्येत घट होत असल्यामुळे शहराच्या दृष्टीकोनातून ही दिलासादायक बाब आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत शहरात 54 हजार 450 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 52 हजार 388 (96.21 टक्के) रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 हजार 233 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सद्यस्थिती 829 रुग्णांवर उपचार सुरु असून त्याचे प्रमाण 1.53  टक्के इतके आहे. परदेशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून वर्तविली जात असून या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. तसेच ब्रिटन कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर महापालिका यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शहरात रुग्ण संख्या कमी झाली असली तरी प्रशासनाने चाचण्यांची संख्या अद्याप कमी केलेली नाही. शहरात दररोज साडे पाच हजार चाचण्या केल्या जात असून त्यात सरासरी 100च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत शहरात 7 लाख 93 हजार 795 चाचण्या झाल्या आहेत. त्यामध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण 6.86  इतके आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली. 

तसेच आठवड्याचा रुग्ण वाढीचा वेग 0.19  टक्के इतका आहे. तर, रुग्ण दुपटीचा कालावधी 428 दिवसांवर आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णालयात 54 टक्के आयसीयूच्या खाटा तर 71 टक्के व्हेंटीलेटरच्या खाटा रिकाम्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि रुग्ण संख्या कमी झाल्यानंतरही चाचण्यांची संख्या कमी केलेली नाही. यामुळेच शहरात करोनाची परिस्थिती आटोक्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा-  एकाच वेळी तब्बल दीड लाख लोकं घेऊ शकतील एवढा साडेतीन टनांचा हुक्का जप्त, मुंबई पोलिसांची मेगा कारवाई

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona Virus thane city under control Only one and a half percent patients

loading image