
वाशी, ता. ११ (बातमीदार) : ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ या गृहनिर्माण योजनेअंतर्गत ६७ हजार घरांची लॉटरी काढण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्प्यातील घरांचा ११ ऑक्टोबरला शुभारंभ करण्यात आला. टप्प्याटप्प्याने या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.
दर चार महिन्यांनी ही लॉटरी काढण्यात येणार असल्याचे सिडकोच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सिडकोच्या घरांचे दर पाहता या लॉटरीमध्ये घर घ्यायचे नसल्यास पुढील येणाऱ्या लॉटरीसाठी अर्जदार वाट बघू शकतात, असे सिडकोच्या अधिकांऱ्याने सांगितले. हे रजिस्ट्रेशन सिडकोच्या ६७ हजार घरांची लॉटरी संपेपर्यंत असणार आहे.