

CIDCO
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. या संपूर्ण परिसराला जागतिक दर्जाचे ठिकाण बनवण्यासाठी सिडकोने (शहर व औद्योगिक विकास महामंडळ) कंबर कसली असून सोयीसुविधांवर भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रवासी आणि उद्योजकांची गरज लक्षात घेऊन सिडकोने मोक्याच्या ठिकाणी तारांकित हॉटेलांच्या उभारणीसाठी सहा भूखंडांची घोषणा केली आहे. या भूखंडांच्या ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रिया सुरू केली असून नवी मुंबईच्या आदरातिथ्य आणि रिअल इस्टेट क्षेत्राला नवी झळाळी प्राप्त होणार आहे.