

CIDCO Housing Lottery
Esakal
नवी मुंबई : स्वतःच्या हक्काच्या घराची अनेक वर्षे वाट पाहणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी सोमवारी आनंदाचा दिवस ठरला. सिडकोच्या बहुप्रतीक्षित 'माझे पसंतीचे सिडकोचे घर माझा पहिला चॉइस' या गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील ८,७९५ सदनिकांची संगणकीय सोडत सोमवारी पार पडली. सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनात पारदर्शक आणि संगणकीकृत पद्धतीने ही सोडत काढण्यात आली.