

CIDCO Co-operative Housing Societies
ESakal
वाशी : घणसोली परिसरात माथाडी कामगार वास्तव्यास असलेल्या सिडकोनिर्मित सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा बहुप्रतिक्षित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. यासंदर्भात ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित झाले आहे. अखेर रविवारी (ता. १४) घणसोली येथे माथाडी हाऊसिंग प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सात सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांची संयुक्त बैठक पार पडली. सोसायट्यांच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये भगवती कन्स्ट्रक्शन या विकसकांची बहुमताने निवड करण्यात आली.