सिडको महामंडळातर्फे पोलिसांसाठीच्या घरांची मंगळवारी सोडत; संकेतस्थळावर प्रसारित होणार

सिडको महामंडळातर्फे पोलिसांसाठीच्या घरांची मंगळवारी सोडत; संकेतस्थळावर प्रसारित होणार
Updated on

नवी मुंबई: सिडको महामंडळातर्फे पोलिस कर्मचाऱ्यांकरिता विशेष गृहनिर्माण योजनेंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या 4466 घरांची संगणकीय सोडत उद्या (ता. 10) होणार आहे. 

सिडकोच्या सातव्या मजल्यावरील सभागृहात दुपारी 12 वाजता सोडत काढण्यात येणार आहे. सिडको महामंडळातर्फे पोलिस कर्मचाऱ्यांकरिता एका विशेष गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ 27 जुलैला केला होता. त्याअंतर्गत 4466 घरे पोलिस कर्मचाऱ्यांकरिता उपलब्ध करून दिली होती. नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये सदनिका साकारण्यात येत आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता उपलब्ध असणाऱ्या योजनेतील सदनिका केवळ मुंबई महानगर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांकरिता राखीव आहेत. एकूण 4466 सदनिकांपैकी 1057 सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि 3409 या अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत.

27 जुलैपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात होऊन योजनेस उत्तम प्रतिसाद लाभला. अर्ज नोंदणी, शुल्क भरणा आदी सर्व प्रक्रिया ऑनलाईनने पार पडल्या. सोडतीचे https://lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर वेबकास्टिंगद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येऊन अर्जदारांना घरबसल्याही निकाल पाहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. निकालाविषयी अद्ययावत माहिती संकेतस्थळावर पाहता येणार आहे. 

CIDCO Corporation leaving houses for police on Tuesday Will be broadcast on the website

----------------------------------------------------------

  ( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com