सिडको गृहलाभार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, पैसे भरण्यासाठी मिळाली इतक्या महिन्यांची मुदतवाढ...

सिडको गृहलाभार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, पैसे भरण्यासाठी मिळाली इतक्या महिन्यांची मुदतवाढ...

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या गृहलाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय. कारण सिडकोमार्फत दिल्या जाणाऱ्या परवडणाऱ्या घरांच्या हफ्त्याबद्दल सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सिडकोच्या गृहलाभार्थ्यांना घराचे पैसे भरण्यासाठी आता आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ  देण्यात आलीये. याचा लाभ तब्बल १५ हजार सिडको गृहलाभार्थ्यांना  मिळणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

गेल्या वर्षी निघालेल्या सिडकोच्या सोडतीत १५ हजार लाभार्थ्यांना सिडको मार्फत घरं लागली होती. या सर्व लाभार्थ्यांना ३० जून ही घराचे हफ्ते भरण्याची शेवटची तारीख देण्यात आली होती. मात्र आता मिशन बिगिन जरी सुरू झालं असलं तरीही कोरोनाच्या धास्तीमुळे सर्वकाही पूर्णपणे सुरु झालेलं नाही.

त्यात सिडको गृहलाभार्थ्यांना  पैशांची जमवाजमव करण्यासाठी घराबाहेर पडता आलेलं नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडको गृहलाभार्थ्यांना मोठा दिलासा दिलाय. आता गृहलाभार्थ्यांना आपल्या घरांचे हफ्ते भरण्यासाठी अधिकचे तीन महिने देण्यात आलेत

नवी मुंबईतील ऐरोली, घणसोली, खारघर, तळोजा, कळंबोली या विविध भागांमध्ये ही घरं आहेत. कोरोनामुळे पैशांची जमवाजमव झाली नसल्याने आपल्या स्वप्नातील घर कोरोनामुळे सोडावं लागतंय की काय असा प्रश्न गृहलाभार्थ्यांना  गृहधारकांच्या मनात निर्माण झालेला. मात्र यावर आता सरकारने महत्त्वाचा निर्णय घेऊन सर्व सिडको गृहलाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय. 

cidco flat owners gets relief as state govt extents EMI deadline by three months

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com