

CIDCO
ESakal
पनवेल : सिडकोच्या घरांच्या अवास्तव दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे घराचे विकत घेण्याचे स्वप्न कायम राहते. सिडकोकडून उभारण्यात येणाऱ्या अल्प उत्पन्न गट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील घरांच्या किमतींमध्ये १० टक्के कपात करण्याचा निर्णय सभागृहात जाहीर करण्यात आला असून, यामुळे सुमारे ६१ हजार घरांच्या किमती कमी होणार आहेत. आमदार विक्रांत पाटील यांनी उचललेला ठाम आणि अभ्यासपूर्ण लढा अखेर यशस्वी ठरला आहे.