धुम्रपान करणाऱ्यांना कोरोनापासून संरक्षण ; कोर्टात अजब दावा

Smoking
Smokingsakal media

मुंबई : धूम्रपान करणाऱ्याना (Smoking) कोरोनापासून संरक्षण मिळू शकते, त्यातील निकोटीनमुळे संसर्ग होण्याचा धोका तुलनेने कमी आहे, असा दावा आज मुंबई उच्च न्यायालयात (High Court) सिगारेट विडी व्यापारी संघटनेच्या (Cigarette traders) वतीने करण्यात आला. कोरोनासंबंधित जनहित याचिकांवर (Public interest Petition) आज मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. कोरोना विषाणू फुफ्फुसावर हल्ला (corona Virus damage lungs) करतो आणि त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. ( Cigarette shop traders petition high court next announcement on coming Thursday )

यासंदर्भात टाटा स्मारक केंद्राचा अहवाल मागील सुनावणी मध्ये महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी दाखल केला होता. या पाश्र्वभूमीवर धूम्रपान करणाऱ्याचा बचाव करण्याबाबत आणि यावर अधिक वैद्यकीय अहवाल दाखल करण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिले होते.

Smoking
80 टक्के भाजलेल्या परदेशी तरूणाला मुंबईतील डॉक्टर्सनी दिले जीवदान

आजच्या सुनावणीमध्ये फेडरेशन ऑफ रिटेलर्स असोसिएशन आणि मुंबई बिडी तंबाखू व्यापारी असोसिएशनच्यावतीने अॅड. रवी कदम यांच्यामार्फत न्यायालयात बाजू मांडण्यासाठी अर्ज करण्यात आला. यावेळी कदम यांनी एक अहवाल दाखल केला ज्यामध्ये निकोटीनमुळे कोरोना संसर्गाचा धोका रोखता येऊ शकतो, असा दावा केला आहे. खंडपीठाने यावर आश्चर्य व्यक्त केले. जर असे असेल तर अशा उत्पादनांवर दिला जाणारा वैधानिक इशारा केंद्र सरकारने काढून टाकायला हवा, असा शेरा खंडपीठाने केला. दोन्ही संघटनांना बाजू मांडण्याची परवानगी खंडपीठाने दिली. याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com