

Cipla Pharma’s Pune unit faced FDA action over drug packaging and storage irregularities before the Bombay High Court intervened
esakal
पुणे वडकी येथील सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेडच्या सी अँड एफ औषध विक्री परवान्याबाबत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) घेतलेला निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करता न येणाऱ्या औषधाच्या पॅकेजिंगवर परवानगी नसलेला मजकूर छापणे आणि औषधांच्या साठवणुकीत गंभीर अनियमितता आढळल्याने एफडीएने २७ ऑगस्टपासून कंपनीचा परवाना तात्काळ प्रभावाने रद्द केला होता. मात्र, या कारवाईला कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने एफडीएच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर एफडीएने परवाना रद्द करण्याचा आदेश मागे घेतला.