
Murbe Bandar
ESakal
पालघर : मुरबे बंदर उभारणीसाठी पालघरमध्ये घेण्यात आलेल्या पर्यावरणविषयक जनसुनावणीला सोमवारी नागरिकांनी (ता. ४) कडाडून विरोध केला. बंदर उभारणीसाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणीय मंजुरीसाठी तयार केलेल्या पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अहवाल त्रुटीयुक्त असल्याची टीका सर्वांनी एकमुखाने केली. हा अहवाल प्रत्यक्ष वस्तुस्थितीवर आधारित नसल्याने घेण्यात आलेली जनसुनावणी बेकायदा असल्याने ती रद्द करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.