माकडांच्या उच्छादाने भाविक हैराण; पाली गावातील नागरिकही जखमी

अमित गवळे
Friday, 20 November 2020

माकडे आणि वानरांनी पालीत उच्छाद मांडला आहे. त्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांसह भाविक हैराण झाले आहेत.

पाली : माकडे आणि वानरांनी पालीत उच्छाद मांडला आहे. त्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांसह भाविक हैराण झाले आहेत. माकडांनी तर हल्ले करून अनेकांना जखमी केले आहे. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभाग आणि तालुका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. 

हेही वाचा - आदित्य ठाकरे- अतुल भातखळकर लढतीत, मनसे गेमचेंजर ठरण्याची शक्यता?

पाली हे बल्लाळेश्‍वराचे ठिकाण आहे. त्यामुळे या गावात भाविकांचीही मोठी संख्या असते; मात्र गावात माकडे आणि वानरांनी धुमाकूळ घातला आहे. याबाबत नागरिकांनी सांगितले की, वानर आणि माकडे छतावर उड्या मारून पत्रे आणि कौले फोडतात. घरातील साहित्याचेही ते नुकसान करतात. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विद्येश आचार्य यांनी गुरुवारी (ता. 19) तहसीलदारांना निवेदन दिले. 

काही वर्षांपूर्वी पालीत माकडांनी असाच धुमाकूळ घातला होता. तेव्हा शासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन माकडांना पकडून बंदोबस्त केला होता. त्यामुळे पालीतील जनतेचा त्रास कमी झाला होता. आता पुन्हा उपाययोजना करावी. 
- विद्येश आचार्य,
सामाजिक कार्यकर्ते 

 

...आणि वानर यांना पकडण्याची कोणतीही आर्थिक तरतूद वनविभागाकडे नाही. ग्रामपंचायत किंवा देवस्थान यांच्या आर्थिक मदतीतून माकडे पकडणारी टीम बोलवता येऊ शकते. नागरिकांनी माकडांना घरचे तसेच शिजविलेले अन्न खाण्यास देऊ नये. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. त्यामुळे माकडांचा उपद्रव आटोक्‍यात येऊ शकेल. 
- समीर शिंदे,
वनक्षेत्रपाल, पाली-सुधागड 

Citizens of Pali suffer due to monkey infestation 

-------------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens of Pali suffer due to monkey infestation