सिटी सेंटर आग प्रकरण: आगीची अग्निशमन दलाकडून चौकशी सुरु

समीर सुर्वे
Monday, 26 October 2020

सेंटर मॉलला लागलेल्या आगीची सोमवारपासून अग्निशमन दलाकडून चौकशी सुरु होणार आहे. या मॉलमध्ये काही बेकायदा स्टॉल्स तयार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. अंतर्गत प्रतिबंधक यंत्रणाही काम करत नसल्याचाही संशय आहे.

मुंबई:  सेंटर मॉलला लागलेल्या आगीची सोमवारपासून अग्निशमन दलाकडून चौकशी सुरु होणार आहे. या मॉलमध्ये काही बेकायदा स्टॉल्स तयार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. अंतर्गत प्रतिबंधक यंत्रणाही काम करत नसल्याचाही संशय आहे.

नागपाडा येथील सेंटर मॉलला गुरुवारी रात्री आग लागली होती. ही आग शनिवारी विझल्यानंतर आज पहाटे कुलिंग ऑपरेशनही संपले आहे. या मॉलमधे काही बेकायदा बदल करण्यात आले होते. तसेच काही बेकायदा गाळेही तयार करण्यात आले होते,  असा आरोप केला जात आहे. तसेच आगीच्या वेळी अंतर्गत अग्निप्रतिबंधक यंत्रणाही काम करत नसल्याची शक्यता आहे. या सर्व बाबी चौकशी नंतर उघड होतील.

अग्निशम दलाकडून आजपासून चौकशी सुरु होणार आहे. यात, घटनास्थळावरील पुरावे, प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी तसेच सुरुवातीला पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाची साक्ष ही घेतली जाणार आहे. 2016 मध्ये देवनार डंपिंगला लागलेली आग 6 दिवस धुमसत होती. त्यानंतर सेंटर मॉलला लागलेली आग 38 तासानंतर नियंत्रणात आली.

अधिक वाचा-  महाराष्ट्राचे मालक असल्यासारखे का वागताहेत, मुख्यमंत्र्यांच्या टीकेला कंगनाचं उत्तर

22 लाख लिटर पाण्याने विझली आग
 
ही आग विझवण्यासाठी तब्बल 22 लाख लिटर पाणी वापरण्यात आले. देवनार डंपिंगला 2016 मध्ये लागलेल्या आगीनंतर ही सर्वाधिक काळ लागलेली आग आहे. तब्बल 38 तास सेंटल मॉल मधील आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाचे जवान झगडत होते. 
देवनार डंपिंग येथील 2016 मध्ये भीषण आग लागली होती.या आगीमुळे मुंबईतील हवेचा दर्जाही खालावला होता. तसेच,उपग्रहांच्या छायाचित्रातूनही ही आग दिसत होती. त्यानंतर मंत्रालय, लोअर परळ कमाल मिल कंपाऊंड येथेही विनाशकारक आगी लागल्या होत्या. मात्र,या आगी 12-14 तासात नियंत्रणात आल्या होत्या. मात्र,सेंटल मॉलची आग नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल 38 तास लागले. गुरुवारी रात्री 8.45 वाजल्याच्या सुमारास लागलेली आग शनिवारी सकाळी 11  वाजल्यानंतर पुर्ण पणे नियंत्रणात आली.

मॉल हा पूर्ण इलेक्ट्रॉनिक गॅझेटचे विक्रेते आहेत. सुमारे 300  दुकाने असून दुसरा आणि तिसरा मजला पूर्णपणे खाक झाला आहे. तर,पहिल्या आणि तळमजल्यालाही आगीची धग बसली आहे.

------------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

City Center fire case Fire brigade starts investigation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: City Center fire case Fire brigade starts investigation