
मुंबई शहर विदृप होतंय, राजकीय होर्डिंग लावू नका असं आवाहन शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी सर्वपक्षांना केलं आहे. इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये आदित्य ठाकरेंनी सडेतोड राजकीय भूमिका मांडली. काम केलंय तर होर्डिंगची गरजंच काय? असंही त्यांनी म्हटलं आहे. (City is getting dirty no political hoardings in Mumbai Aditya Thackeray appeal to all parties)
आदित्य ठाकरे म्हणाले, "सध्याच्या राजकीय परिस्थितीत मुंबई सगळीकडं राजकीय होर्डिंग्ज पहायला मिळतात, ज्यामुळं संपूर्ण शहर विदृप दिसत आहे. आम्हीही अशा प्रकारचे होर्डिंग लावले आहेत पण आता सर्वांनी हे राजकीय होर्गिंड लावायचं थांबवलं पाहिजे"
कारण ज्यावेळी आपण मुंबई शहरात फिरतो तेव्हा खूपच ऑकवर्ड वाटतं. आपल्याला ट्रॅफिक सिग्नलही दिसू शकत नाही केवळ आमचे चेहरेच दिसत आहेत. आम्ही राजकीय लोक त्यामध्ये इंटरेस्टेड असू पण सर्वसामान्य लोकांना त्यात स्वारस्य नाही. हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. आपण होर्डिंगशिवाय काम करायला हवं, लोकांना काम हवंय लोक ते पाहून तुम्हाला मतदान करतील त्यासाठी होर्डिंगची गरज नाही, हा मुद्दाही यावेळी आदित्य ठाकरे यांनी यावेळी मांडला, असंही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.