भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागताच हाणामारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोंबडपाडा येथील गावदेवी मंदिर परिसरात कार्यक्रम आयोजनाच्या वादातून दोन गटांत हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी माजी महापौर विलास पाटील यांच्यासह दोन्ही गटांतील एकूण ३० जणांविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.