
मुंबईतील दादर रेल्वे पूर्व स्थानकाबाहेरील हनुमान मंदिरावरून आता वाद निर्माण झाला आहे. हे मंदिर बेकायदा बांधकाम असून ते रेल्वेच्या जमिनीवर बांधण्यात आल्याची नोटीस मध्य रेल्वे प्रशासनाने मंदिर ट्रस्टला दिली आहे. रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी हे मंदिर हटवावे लागणार आहे. मात्र यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यानंतर या नोटीसीला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमैय्यांनी या ठिकाणी भेट दिली. यावेळी इथे तणाव निर्माण झाला आहे.