नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पाचवीचा समावेश प्राथमिक वर्गात; राज्य सरकारचा निर्णय

सिद्धेश्वर डुकरे
Wednesday, 16 September 2020

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने राज्यात आता इयत्ता पाचवीचा समावेश प्राथमिक वर्गात केला जाणार आहे.

मुंबई:नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने राज्यात आता इयत्ता पाचवीचा समावेश प्राथमिक वर्गात केला जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारने नुकताच जारी केला आहे. हा निर्णय राज्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित सरकारी व खासगी शाळांना लागू असेल.

अर्थव्यवस्थेला अद्यापही कोरोनाचा धोका; वाढ मंदगतीनेच होणार; रिझर्व्ह बँक गव्हर्नर दास यांचे मत

या निर्णयानुसार, इयत्ता पाचवीचा नवा वर्ग प्राथमिक शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने जोडण्यात यावा, असे म्हटले आहे. पहिल्या टप्प्यात प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पाचवीचा वर्ग जोडताना ज्या शाळांमध्ये भौतिक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत, त्या शाळांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पाचवीचा वर्ग जोडताना नवी वर्गखोली उपलब्ध नसेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेने अन्य पर्यायी व्यवस्था करावी किंवा नवीन वर्गखोली बांधण्यात यावी, असेही या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. तसेच, सदर नवीन वर्ग जोडताना विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार व त्यांच्या घराजवळील शाळेत तो वर्ग असेल, असे नियोजन करावे, असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The class V in the primary class on new national education policy

टॉपिकस