esakal | बोगस, मगृर मार्शल अडचणीत; घाटकोपर मध्ये पोलीस ठाण्यात तक्रार | Ghatkopar
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

बोगस, मगृर मार्शल अडचणीत; घाटकोपर मध्ये पोलीस ठाण्यात तक्रार

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी (public place) मास्क न वापरणाऱ्या (Mask) तसेच अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नियुक्त करण्यता आलेल्या मार्शलना (clean up marshal) गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. मात्र, आजही अनेक ठिकाणी गणवेश परीधान न करता मार्शल वसुली करत आहे. अशाच एका प्रकारात घाटकोपर (Ghatkopar) येथील पंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार (police complaint) दाखल करण्यात आली आहे. तर, मार्शलच्या मगृरीचे प्रकारही उघड होत असून त्याची दखल घेऊन महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) सोमवारी बैठकही घेणार आहेत.

हेही वाचा: जावेद अख्तर यांच्या विरोधातील दाव्याची कोर्टाने घेतली दखल

कोविडच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत सार्वजनिक ठिकाणी नागरीकांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे.मात्र, तरीही मास्क न वापरता फिरणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशावर कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेने संपूर्ण 750च्या आसपास खासगी मार्शल नियुक्त केले आहेत. या मार्शल बाबत वारंवार तक्रारी येत आहे. काही वेळा नागरीकही त्यांच्या बरोबर अरेरावी करताना आढळले आहेत. तर, मार्शलच्या मगृरीचे व्हिडीओही व्हायरल झालेत आहे. या प्रकरणाची दखल महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली आहे. याबाबत संबंधीत सोमवारी आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांच्या बरोबर चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल. यात जर संबंधीत मार्शलची चुक आढळल्यास त्यांच्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात येईल असे महापौरांनी सांगितले.

घाटकोपर पुर्व परीसरात काही दिवसांपुर्वी मार्शल गणवेश न घातला कारवाई करताना आढळले होते. महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रविण छेडा यांनी याबाबत पालिका कार्यालयात तक्रार केली.त्यावर हे मार्शल बोगस असण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यानंतर छेडा यांनी पंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.हे मार्शल एका दुचाकीवरुन त्या परीसरात आले होते. त्या दुचाकीच्या क्रमांकासह ही तक्रार करण्यात आली आहे.त्यामुळे त्यांना शोधणे सोप्पे होईल असे छेडा यांनी सांगितले.

loading image
go to top