esakal | वातावरण बदलाचा फटका; अॅलर्जीच्या रुग्णांमध्ये 30 ते 40 टक्क्यांनी वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

 patient

वातावरण बदलाचा फटका; अॅलर्जीच्या रुग्णांमध्ये 30 ते 40 टक्क्यांनी वाढ

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दिवस आणि रात्रीच्या तापमानात तीव्र चढउतारामुळे (Climate changes) शहरात अॅलर्जी आणि व्हायरल इन्फेक्शनमध्ये (viral infection) वाढ झाली आहे, विशेषत: रुग्णांना श्वसनाच्या समस्या (breathing problems) निर्माण झाल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आरोग्य विभागाने सांगितले की, गेल्या पंधरवड्यात अॅलर्जीची सुमारे 30-40 टक्के रुग्ण (Allergy Patient) नोंदवले गेले आहेत. दरम्यान, वैद्यकीय तज्ञांनी मुंबईकरांना हंगामी संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीची पावले (precautions) उचलण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा: पर्यावरणस्नेही शाडूच्या गणेश मूर्तींकडे भक्तांचा कल

सर्दी, खोकला, विषाणूजन्य ताप हे सर्वात सामान्य आजार आहेत. आणि आता डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या अनिश्चित हवामानामुळे श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता जास्त आहे. किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम), लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल, डॉ. आरएन कूपर म्युनिसिपल जनरल आणि बीवायएल नायर रुग्णालय या चार प्रमुख पालिका रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागांमध्ये (ओपीडी)  अॅलर्जिच्या प्रकरणांमध्ये 35 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तर, व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये जवळपास 30-35 टक्के वाढ झाली आहे.

“गेल्या काही दिवसांपासून, हवामानातील बदलामुळे आमच्या ओपीडीला भेट देणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यापैकी बहुतेक मुले आणि ज्येष्ठ नागरिक आहेत आणि अनेकांनी विषाणूजन्य तापामुळे अॅलर्जिची तक्रार केली आहे, ”असे प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की छातीत अॅलर्जीच्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. प्रदूषणामुळे लोकांना बाहेर फिरायला जाण्यापासून सावध केले जात आहे.

“ वायू प्रदूषणात झालेली वाढ श्वसन प्रणालीवर हल्ला करते. शिवाय, कार्बन मोनोऑक्साइडचे उच्च स्तर थेट हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर आणि संपूर्ण श्वसनमार्गावर, विशेषत: मुलांवर  जास्त परिणाम करतात, असेही डॉ. भारमल म्हणाले.

हेही वाचा: मुंबईत दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची दुपटीने नोंद; मृत्यूंमध्ये मात्र घट

डॉक्टरांनी गर्भवती महिलांना अतिरिक्त खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, विषाणूजन्य तापाने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. या रूग्णांना अति ताप, खोकला, घसा खवखवणे आणि शरीरदुखीचा त्रास होतो. ते म्हणाले, " तापमानात चढ -उतार होत असताना, पालिका रुग्णालयांमध्ये व्हायरल इन्फेक्शन आणि पोटाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते."

संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले की , "जर रुग्णांना विषाणूजन्य ताप किंवा श्वसनाशी संबंधित समस्यांची लक्षणे दिसली तर त्यांनी त्वरित स्व-औषधांचा अवलंब करण्याऐवजी रुग्णालयात उपचार घ्यावेत." बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) श्वसनाच्या समस्यांसह दररोज किमान दहा रुग्ण येत आहेत. प्रत्येकाला हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नसते परंतु ज्या ठिकाणी जास्त ताप असतो, 100 अंशांपेक्षा जास्त असतो तेव्हा रुग्णालयात दाखल करुन घेतले जाते असे केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, पावसाच्या वातावरणात तापाची प्रकरणे सामान्य असतात. विषाणू दमट परिस्थितीत फिरतात. या हंगामात तापमानातील चढउतार जास्त असतात.

loading image
go to top