मुंबईचे हवामान ढगाळ; तापमानात घट झाल्याने दिलासा

समीर सुर्वे
Sunday, 29 November 2020

आज दिवसभर मुंबईत ढगाळ वातावरण दिसले. ढगाळ वातावरणामुळे शहर आणि उपनगरातील तापमानासह वातावरणात ही बदल जाणवले.

मुंबई : आज दिवसभर मुंबईत ढगाळ वातावरण दिसले. ढगाळ वातावरणामुळे शहर आणि उपनगरातील तापमानासह वातावरणात ही बदल जाणवले. मुंबईतील तापमानात काहीशी घट झाल्याने दिवसरातील उन्हाची काहीली ही कमी झाली. 

हेही वाचा - बटनामध्ये कोकेन लपवून तस्करी! आंतरराष्ट्रीय टोळीतील तिघांना अटक

दिनांक 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा पर्यंत कुलाबा आणि सांताक्रूझ मध्ये तापमानात बदल जाणवले. काल कुलाबा येथे कमाल 33.8 डिग्री सेल्सीयस तापमान नोंदवले गेले होते, त्यात आज घट होऊन ते 31.7 डिग्री सेल्सीअस पर्यंत खाली आले. तर सांताकृज येथे कमाल तापमान 34.2 डिग्री सेल्सीअस नोंदवले गेले होते, त्यात आज घट होऊन ते 33.3 डिग्री सेल्सीअस पर्यंत खाली आले.      

हेही वाचा - कल्याण-कसारा लोकल मार्गावर; महिला प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर  रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक

ढगाळ वातावरणामुळे शहर आणि उपनगरामध्ये जास्तीत जास्त तापमानात कमी प्रमाणात बदल दिसून येतो. हा बदल पुढील एक आठवडा कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील वातावरण काहीसे उदास पण आनंददायी राहील असा अंदाज ही मुंबई हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.

Cloudy weather in Mumbai Relief from the drop in temperatur

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cloudy weather in Mumbai Relief from the drop in temperature