'जलयुक्त'चा तिसरा टप्पा 18 हजार गावांत, दोन मोठ्या योजनांचाही समावेश; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Jalyukta Shivar Yojana: महाराष्ट्रातील १८ हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेचा तिसरा टप्पा राबवण्यात येणार आहे, मुख्यमंत्री यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
CM devendra fadnavis

CM devendra fadnavis

esakal

Updated on: 

मुंबई : राज्यातील १८ हजार गावांत जलयुक्त शिवार योजनेचा तिसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पंतप्रधान कृषी सिंचन, मनरेगा या दोन योजनांचाही समावेश करण्यात येणार आहेत. पावसाच्या पाण्याचा केंद्र शासनाच्या जलसंचय जनभागीदारी अभियानांतर्गत राज्यात मे २०२७ पर्यंत ३४ लाख ८३ हजार ९४० भूजल पुनर्भरण संरचनांची निर्मिती पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलशक्ती अभियान राबविण्याबाबत झालेल्या बैठकीत आज दिली.

Loading content, please wait...