

Kharghar-Turbhe Link Road
ESakal
खारघर : खारघर आणि तुर्भेदरम्यानची वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उभारण्यात येत असलेला खारघर-तुर्भे टनेल लिंक रोड प्रकल्प सप्टेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात दिली. या घोषणेमुळे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.