

BDD Chawl Redevelopment.
ESakal
मुंबई : बीडीडी चाळींसह विविध पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबईची पुनर्बाधणी होत असली तरी मुंबईची परंपरा, संस्कृती आणि इतिहास जपणाऱ्या मूळ मुंबईकरांना आणि दीर्घकाळापासून येथे राहत असलेल्यांना मुंबईबाहेर हद्दपार होऊ देणार नाही. त्यांना मुंबईत आहे त्याच ठिकाणी मोठी घरे दिली जातील, अशी ग्वाही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प त्याचे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.