
मुंबई : गोविंदांना सरकारकडून मिळणाऱ्या विमाकवचात वाढ करून ते दीड लाख गोविंदांना देण्यात यावे, अशी मागणी करीत आज दहीहंडी समन्वय समितीने मंत्री ॲड. आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मकता दाखवत याबाबत क्रीडा विभागाला निर्देश दिले आहेत.