

CM devendra fadnavis
esakal
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील पूर्व-पश्चिम जोडणी अधिक सक्षम करण्याच्या आणि रस्ते, मेट्रो व भुयारी वाहतूक सुविधांचे एकात्मिक जाळे निर्माण करण्याच्या दृष्टीने गुरुवारी चार महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे लोकार्पण, शुभारंभ व नामकरण पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएमआरडीएच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा सोहळा झाला.