

Devendra Fadnavis on Tanker Accident
ESakal
मुंबई : ‘‘ मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर तीन फेब्रुवारी रोजी झालेल्या ट्रॅंकरचा अपघात आणि त्यानंतरची कोंडी यावर तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र तेवढ्या जलदगतीने ती झाली नाही, ’’असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले. तसेच ज्वलनशील पदार्थांच्या वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाल्यास काय करायचे, याची एसओपी (प्रमाणित कार्यपद्धत) ठरविण्यास केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या तेल कंपन्यांना आदेश दिले आहेत, अशीही माहिती त्यांनी विधानसभेत दिली.