

Devendra Fadnavis On Nashik Road Potholes
ESakal
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना नाशिकच्या रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि खड्यांमुळे झालेल्या पाच नागरिकांच्या मृत्यूवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. 'कोट्यवधी रुपये खर्च करूनही नाशिककरांचा रोष कमी होत नसेल, तर आपण कुठे चुकतो आहोत याचे आत्मपरीक्षण करा. कारणे सांगू नका; नागरिकांच्या समस्या सोडवा,' अशा कठोर शब्दांत त्यांनी प्रशासनाला सुनावले.