
Mumbai Coastal Road : कोस्टल रोडसंदर्भातील मच्छिमारांचा वाद मिटला! सरकारने घेतला मोठा निर्णय
कोस्टल रोड प्रकल्पाच्या खांबांमधील अंतरावरून पालिका आणि वरळी कोळीवाड्यातील मच्छिमार यांच्यातील वाद अखेर मिटला आहे. मासेमारी बोटींचा अपघात टाळण्यासाठी बीएमसीने कोस्टल रोड प्रकल्पातील तीन खांब ७ ते ९ यादरम्यानचा खांब क्रमांक ८ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोस्टल रोड प्रकल्पात वरळी येथील समुद्रातील दोन खांबांमधील अंतर १२० मीटर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आली आहे. यापूर्वी हे अंतर ६० मीटर ठेवण्यात आले होते. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.
कोस्टल रोडसंबंधी चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले की, पुलाच्या खांबामधून बोटी व्यवस्थित गेल्या पाहीजेत यासाठी कोळी बांधवांची मागणी होती त्यामधील अंतर ६० मीटरहून १२० मीटर करा. पण डिझाईन पुर्ण होऊन काम सुरू झालं होतं. ७० टक्के काम झालं होतं. पण हे सरकार भूमिपुत्रांचं असल्याने त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये म्हणून सरकारने सकारात्मक निर्णय घेतला, असे शिंदे म्हणाले.
हेही वाचा: Ativrushti Nuksan Bharpai : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईत मोठी वाढ
विकासामध्ये तेथे राहणाऱ्या लोकांवर आण्याय होऊ नये. तेथील लोकांच्या संमतीने काम व्हाव ही भूमिका सरकारने घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. एक समिती नेमून त्यावर आभ्यस केला. यात राष्ट्रीय-आंतरराष्टीय लोकं, कोळीवाड्यातील लोक होते. त्यानंतर यातून तोडगा काढण्यात आला असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या बदलसांमध्ये साडे सहाशे कोटी अधिकचा खर्च येणार असल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
हेही वाचा: Mukhtar Ansari News : यूपीचा कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीला १० वर्षाचा तुरूंगवास
या कोस्टल रोडच्या अभ्यासासाठी तज्ज्ञांनी पालिकेला दोन खांबांमधील अंतर १६० मीटर करण्याची विनंती केली. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चा आणि बैठकांनंतर अखेर महानगर पालिकेने हे अंतर १२० मीटर ठेवण्याचा निर्णय घेतला असून मच्छीमार संघटनांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. कोस्टल रोड प्रकल्पात एकूण ११ खांब बांधण्यात येणार असून ५ खांबांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. आता ८ क्रमांकाचा खांब कमी होऊन दोन खांब ७ ते ९ मधील अंतर १२० मीटर राहील.