
Mukhtar Ansari News : यूपीचा कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीला १० वर्षाचा तुरूंगवास
Mukhtar Ansari Gangster Case : माजी आमदार आणि माफिया डॉन मुख्तार अन्सारी यांना गुरुवारी न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. गाझीपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयाने माजी आमदार अन्सारी यांना ही शिक्षा सुनावली आहे. मुख्तार अन्सारी आणि भीम सिंग यांना गँगस्टर अॅक्ट अंतर्गत दोषी ठरवल्यानंतर गुरुवारी न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली.
आमदार मुख्तार अन्सारी यांच्या विरोधात 1996 मध्ये दाखल करण्यात आलेल्या गँगस्टर प्रकरणात गुरुवारी न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. गाझीपूरच्या विशेष एमपीएमएलए कोर्टाने दुपारी 2.30 च्या सुमारास निकाल दिला आहे. मात्र, निकालाच्या वेळी मुख्तार अन्सारी न्यायालयात हजर नव्हता. ईडीच्या कोठडीत असल्याने आणि सुरक्षेच्या कारणास्तव मुख्तार अन्सारी यांना गाझीपूर न्यायालयात पाठवण्यात आले नाही. त्यामुळे प्रयागराज येथील ईडी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करण्यात आली होती.
हेही वाचा: Birendra Saraf : बिरेंद्र सराफ राज्याचे नवे महाधिवक्ता; राज्यपालांची मोहर
1996 मध्ये मुख्तार अन्सारी विरोधात गँगस्टर अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. अन्सारी यांच्यावर पाच गुन्ह्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. काँग्रेस नेते अजय राय यांचा मोठा भाऊ अवधेश राय खून प्रकरण आणि अतिरिक्त एसपींवरील खुनी हल्ला यांचाही या पाच प्रकरणांमध्ये समावेश आहे.
या प्रकरणी न्यायालयाने तब्बल 26 वर्षांनंतर शिक्षा सुनावली आहे. काहीही झाले तरी मुख्तार अन्सारी यांना पहिल्यांदाच शिक्षा झाली आहे. अवधेश राय यांची हत्या, कॉन्स्टेबल राजेंद्र सिंग यांची हत्या, कॉन्स्टेबल रघुवंश सिंग यांची हत्या, अतिरिक्त एसपींवरील हल्ला आणि गाझीपूरमधील पोलिसांवर हल्ला याप्रकरणी एकाच वेळी गँगस्टर अॅक्ट लागू करण्यात आला होता.
हेही वाचा: Bharat Jodo Yatra : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा राहुल गांधीसोबत...; फोटो शेअर करत म्हणाला…
तर मुख्तार अन्सारी यांनी ईडी अधिकाऱ्यांना खटल्याचा निकाल येईपर्यंत चौकशी न करण्याची विनंती केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुख्तार यांचे हे आवाहन मान्य केले आहे. त्यानंतर गुरुवारी त्यांची चौकशी सुरू झाली नाही. मात्र, तत्पूर्वी बुधवारी रात्री उशिरा त्याची चौकशी करण्यात आली.