ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

CM Fadnavis on Ajit Pawar Plane Crash अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी निवेदन सादर केलं. यात त्यांनी पायलट बदलल्याच्या आरोपांसह सीसीटीव्ही फूटेजबद्दल माहिती दिलीय.
Pilot Change and CCTV Footage CM Fadnavis Breaks Silence on Ajit Pawar Incident

Pilot Change and CCTV Footage CM Fadnavis Breaks Silence on Ajit Pawar Incident

Esakal

Updated on

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी आक्रमकपणे केलीय. अपघात नसून घातपात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय. तसंच या प्रकरणी कर्नाटकात झिरो एफआयआर दाखल केलीय. यावरून सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदन सादर केलं. यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार अपघाताच्या दिवशी मुंबई विमानतळावर पोहोचल्याचे आणि विमानात बसल्याचे, ते विमान बारामतीत दुर्घटनाग्रस्त झाल्याचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे अशी माहिती दिली. पायलट ऐनवेळी बदलले नव्हते, त्यांच्याकडे योग्य तो परवाना होता आणि विमान उड्डाणाआधी त्यांची ब्रेथ अॅनालायजर चाचणीही झाली होती असं स्पष्ट केलं. CM Fadnavis Reveals Details on Ajit Pawar Plane Incident

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com