
मुंबई : ‘‘राज्यातील विविध प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांना सरकारच्या संबंधित विभागांकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र या भोंग्यांद्वारे आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकाला जबाबदार धरण्यात येईल. तसेच संबंधित प्रार्थनास्थळाला पुन्हा भोंगा लावण्याची परवानगी दिली जाणार नाही,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जाहीर केले.